Header Ads

पतीनेच केला पत्नीचा खून; अंबवडे खुर्द येथील घटना satara

सातारा : सातारा तालुक्यातील परळी भागातील अंबवडे खुर्द येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सज्जन हंकारे, हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी मृत पत्नी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडली होती. मृत महिलेचे नाव राधिका सचिन गुजर असून, तिचा पती सचिन भगवान गुजर हा मानसिक आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती वादातून हा खून घडल्याची शक्यता व्यक्त होत असून, सातारा तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

No comments