Header Ads

कास पठाराचा एक्सप्रेस मार्ग होणार हरित; खा.उदयनराजे व आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते १ हजार वृक्षारोपणाचा शुभारंभ satara

सातारा : कास पठारामुळे जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर अधोरित झाले आहे. हायब्रिड अ‍ॅम्युनिटी योजनेंतर्गत सातारा ते कास या रस्त्याचे काम देसाई उद्योग समुहाने उत्कृष्ठ केले असून, याच्या सुशोभिकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा १ हजार झाडे लावण्यात आल्याने हा एक्सप्रेस मार्ग हरित होणार आहे. या वृक्षारोपणाचा शुभारंभ खा.श्री.छ.उदयनराजे भोसले व आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देसाई उद्योग समुहाने केलेल्या या कामाचे कौतुक केले.

सातारा जिल्ह्यातील कास पठाराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. तेथील निसर्ग सौंदर्य, फुलांचा गालिचा ते याची देही, याची डोळा अनुभवतात. मात्र, या पठाराचा प्रवास पर्यटकांना त्रासदायक ठरत होता. गणपती खिंड, आंबाणी, पिसाणी, पेटेश्‍वरनगर, पेटी येतेश्‍वर तसेच आंबाणी गावापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती. त्यामुळे कास पठार खुणावत असले तरी पर्यटकांची वाट मात्र बिकट बनलेली. गत अनेक वर्षांपासुन या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यामुळे पर्यटकांना खाचखळग्यातून प्रवास करावा लागत होता. मात्र हायब्रीड अ‍ॅम्युनिटी योजनेंतर्गत देसाई उद्योग समुहाने हे काम उत्कृष्टरित्या केले असून आज रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केल्यामुळे या रस्त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँक संचालक अनिल देसाई, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. राजभोज, कार्यकारी अभियंता पश्‍चिम विभाग श्री. उत्तुरे, कार्यकारी अभियंता श्री. दराडे, देसाई उद्योग समुहाचे प्रमुख अरुण देसाई, विजय देसाई, महेंद्र देसाई, मार्केट कमिटी सभापती विक्रम पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. एन. पाटील, श्री. निकम, वनविभाग अधिक्षक सौ. शीतल राठोड उपस्थित होते.

No comments