Header Ads

अंशदायी पेन्शन धारक मयत सभासदाचे २० लाख कर्ज माफ; कर्जाच्या व्याजदरात कपात : शिक्षक बँकेचा ऐतिहासिक निर्णय satara

सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा ही जिल्ह्यातील  शिक्षकांची महत्वाची बँक आहे. या बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे व उपाध्यक्ष महेंद्र अवघडे व संचालक मंडळाने नुकताच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बँकेच्या सभासदांसाठी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सेवेत असताना सभासदाचे मयत झाले तर कुटुंब मोठ्या अडचणीत सापडत होते. कर्ता माणूस गेल्याचे दुःख असताना कर्जाची परतफेड कशी करायची याची विवंचना कुटूंबाला असे. त्यामुळे मयत शिक्षक सभासदाचे १५ लाखांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर अंशदान निवृत्तीवेतन धारकांना शासनाने  नोव्हेंबर २००५ पासून पेन्शन योजना रद्द करून अन्यायकारक अंशदान निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे..त्यामुळे जे असे सभासद मयत होत होते, त्यांचे कुटुंबीय मोठ्या आर्थिक संकटात सापडले जात होते.या पार्श्वभूमीवर या कुटुंबाला बँकेमार्फत मदत व्हावी अशी मागणी Dcps धारक करत होते.दरम्यान १ जुलै पासून ओव्हर ड्राफ्ट (ओ.डी. ) कर्जाचा व्याजदर ११ टक्के ऐवजी १० टक्के करण्यात आला आहे. व कर्ज मर्यादा ५ लाखावरुन ८ लाख करण्यात आली आहे.

या मागणीला संचालक मंडळाने प्रतिसाद दिला असून Dcps धारक सभासदांचा जर मृत्यू झाला तर त्याचे २० लाखाचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अश्या प्रकारे Dcps धारक सभासदांचा विचार करणारी सातारा जिल्हा शिक्षक बँक ही राज्यातील पहिलीच बँक असून या निर्णयामुळे Dcps धारक सभासदांकडून समाधान  व्यक्त होत आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, उपाध्यक्ष महेंद्र अवघडे व सर्व संचालक मंडळाचे शिक्षक वर्गातून अभिनंदन होत आहे.

No comments