Header Ads

१४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित; क्षेत्र माहुली येथील ३ जणांना डिस्चार्ज तर २९३ जणांचे नमुने पाठविले तपासणीला satara

सातारा : जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित  10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय (ILI) 2  असे एकूण 14 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आले आहे. तसेच आज 3 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये पाटण तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला. माण तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 65, 50, 27  वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी. वाई तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

3 जणांना आज डिस्चार्ज तर 293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 50, कृष्णा मेडिकल 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 30, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 असे एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे  नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

No comments