Header Ads

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना बाधित; कामकाज दोन दिवस बंद satara

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोचलाअसून, प्रादुर्भाव थांबावा यासाठी सातारा जिल्हा 17 जूलैपासून लॉककडाऊन करण्यात आलेला आहे. मिनी मंत्रालय म्हणून समजले जाणारे जिल्हा परिषद कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. कोरोना फायटरची भुमिका बजाविणारे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांचा अहवाल पोझिटिव्ह आला आहे. पाच दिवसांपुर्वी शिरवळ येथील आलेल्या कोरानाबाधित रिपोर्टमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दोन्ही मुलांना कोरोना असल्याचा रिपोर्ट आला होता. त्यांचा लहान मुलगा आधी कोरोना बाधित झाल्याचे समजले. त्यानंतर मोठा मुलगा बाधित झाला. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष हे कोरोना बाधित झाल्याचे समजताच संपुर्ण शिरवळ शहरासह परिसरातील गावे, वाड्या वस्त्या काळजीत पडल्या.

सोशल मिडियावर अनेकांनी दादा, लवकर बरे व्हा.. अशी भावनिक साद घातली. त्यावर मी पुर्णतः चांगला आहे, काळजी नसावी असा संदेश पाठविण्यास प्रारंभ केला. दरम्यान १० जुलैला खंडाळा पंचायत समिती सदस्य ही कोरानाबाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. यानंतर तालुक्यातील दुसरा पदाधिकारी कोरानाबाधित झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याने सातारा जिल्हा परिषदेत गुरुवार आणि शुक्रवार सॅनिटायझेशऩ करण्यात येणार आहे. त्यामुळे या २ दिवसांत अर्थ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वगळता कोणीही येऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुरक्षितता म्हणून अर्थ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

No comments