Header Ads

आज १४ जणांना दिला डिस्चार्ज; एक मृत व्यक्तिसह ४३९ जणांचे नमुने पाठविले तपासणीसाठी satara

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 2, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथुन 1, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 8, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथुन 3 असे एकूण 14 जणांना आज दहा दिवसांनंतर  रुग्णालयतून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील  24 वर्षीय पुरुष, म्हाते खु. येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय बालक. सातारा तालुक्यातील गोजेगांव येथील 74 वर्षीय पुरुष, आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष. कोरेगांव तालुक्यातील नायगांव येथील 44 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील धामणी येथील 50 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील  24 वर्षीय महिला, गोवारे येथील 40 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालीका. कराड तालुक्यातील तुळसण येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष.

एक मृत व्यक्तिसह 439 जणांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

तसेच आज सकाळी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल झालेल्या लिंब ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड संशयित म्हणुन उपचार करतेवेळेस त्याचा नमुना तपासणी करीता घेण्यात आला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 32, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 55, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 51, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 50, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 3, वाई येथील 58, शिरवळ येथील 57,रायगांव येथील 3, पानमळेवाडी येथील 31, मायणी येथील 19, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 44, खावली येथील 31 असे एकूण 439 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  घेण्यात आले असुन एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

No comments