Header Ads

कंदी पेढयांना जीआय मार्क मिळवण्यासाठी संग्राम बर्गेंचा पुढाकार; जीआय मार्क मिळवण्यासाठी लागेल ते सहकार्य करू : खा.उदयनराजे satara

सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेली सातारची भुमी ऐतिहासिक भुमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला चांगली दिशा देण्याचे काम सातारच्या बुध्दीमत्तेने केले असून, शूरवीर, आजी-माजी सैनिकांचा आणि क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारची जगात ओळख असली तरी सातारी कंदी पेढयांमुळेही सातारा जिल्हयाची जगात वेगळी ओळख आहे. ही ओळख अधिकाधिक ठळक करण्यासाठीच सातारा जिल्हयातील कंदी पेढे व्यावसायिकांची संस्था स्थापन करुन, कंदी पेढयांचे जीआय मार्क मिळवण्यासाठी लागेल ते सहकार्य राहीले असे उद्गार सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले. याकामी संग्राम बर्गे यांनी पुढाकार घेतला असून, या बैठकीस उपस्थित पेढे व्यावसायीकांचे त्यांनी स्वागत केले. यावेळी माजी शिक्षण मंडळाचे सभापती वसंतशेठ जोशी, योगेश मोदी, अर्जुन मोदी, कन्हैयालाल राजपुरोहित, प्रशांत मोदी, महेश निकम, विशाल मोदी, ओंकार जगदाळे, श्रीधर पारुदेकर, सुजित जाधव, यांसह बहुसंख्य कंदी पेढे व्यावसायिक उपस्थित होते. 

जलमंदिर पॅलेस,सातारा येथे सातारा व आसपासच्या प्रसिध्द कंदी पेढे व्यावसायीकांची सोशल डिस्टसिंग पाळुन, विशेष बैठक झाली, त्यावेळी मार्गदर्शन करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कंदी पेढे सर्वत्र मिळत असले तरी, सातारच्या कंदी पेढयांची वेगळी चव आणि ओळख आज सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. सातारी कंदी पेढे तयार करण्याची परंपरागत पध्दत अत्यंत चांगली आणि हायजेनिक आहे. सध्या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीमुळे परंपरागत पध्दत अगदी काही मोजक्या ठिकाणीच पहायला मिळते, तथापि इतर कंदी पेढे आणि सातारचे कंदी पेढे यांची पध्दत आणि धाटणी थोडी वेगळी आहे. जगाच्या पाठीवर सातारी कंदी पेढयांची ओळख अधिक ठळक करण्यासाठी कंदी पेढे उत्पादकांचे एकीकरण करुन, सामुहिक रित्या कंदी पेढयांना जीऑग्राफिकल आयडेन्टीफिकेशन मिळवण्यात येणार आहे. सातारी कंदी पेढयांची जगामध्ये ओळख आहे पण त्याला कायदेशीर मानांकन मिळवला गेला पाहीजे. त्यासाठीच पेढे उत्पादकांची संस्था नोंदणी करुन, विशेष प्रयत्न केले जातील असे याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगीतले.

No comments