Header Ads

कोरोनाप्रसार रोखण्यासाठी कडक पावले उचला; ना.अजित पवार यांचे जिल्हा प्रशासनास निर्देश satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दि. १ जुलै रोजी ३५४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून, ७४३ रुग्णांना घरी सोडले आहे तर ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याची तयारीही उपमुख्यमंत्र्यांनी दर्शवली.

No comments