Header Ads

परिस्थिती बदलली नाही तर चोर्‍यामार्‍या वाढतील, लोकांच्यात उद्रेकाची भावना; शासनाने सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवावा : खा.उदयनराजे satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांसमोर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तज्ज्ञांशी विचारविनिमय करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. परिस्थिती बदलली नाही तर चोर्‍यामार्‍या वाढतील. लोकांच्यात उद्रेकाची भावना आहे. याची दखल घेवून शासनाने सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केली. सातार्‍यातील औद्योगिक वसाहत, हॉटेल व्यावसायिक, पुणे-सातारा-मिरज रेल्वे मार्ग भूसंपादन, सातारा नगरपालिकेच्या विविध समस्यांवरही खा. उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी सुनील काटकर, अ‍ॅड. दत्ता बनकर, जितेंद्रसिंह खानविलकर, विवेक निकम, अनिता देशमुख आदी उपस्थित होते.

राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना, राज्य शासनाकडून अ, ब, क आणि ड श्रेणीनुसार कलाकार मानधन दिले जाते. हे मानधन कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वितरीत करण्यात आलेले नाही, ते त्वरित वितरीत करावे. तथापि भविष्यात हे मानधन नियमित वेळेत मिळावे, राज्यातील नाट्यगृहे आणि ग्रंथालये पुरेशी सुरक्षा घेवून, त्वरीत सुरु करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासह तमाशा-बारी लोककलावंतांचे दैनंदिन जीवन कोरोनामुळे असह्य झाले आहे. त्याकरीता लोककलाकारांना शासनाने भरीव मदत करावी, अशी मागणी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यशासन जेष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता श्रेणीनुसार ठराविक मानधन प्रदान करीत असते. तथापि हे मानधन कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर संबंधित ज्येष्ठ कलाकार व्यक्तींना वितरीत करण्यात आलेले नाही. हे मानधन तोकडे असले तरी मावळतीचा सूर्य बघत असलेल्या ज्येष्ठ कलाकारांना त्याचा मोठा आधार असल्याने, हे मानधन एक रकमी, राज्यभरातील सर्व संबंधितांना तातडीने प्रदान करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका विशेष पत्राने केली आहे.

No comments