Header Ads

४२ नागरिकांना दिला डिस्चार्ज; ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर ४६२ जणांचे नमुने तपासणीला satara

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 42 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील  आनेवाडी पोलीसस्टेशन येथील 20 वर्षीय युवक, सायगाव येथील वय 20,19,19 वर्षीय युवक व 22, 46 वर्षीय महिला, तेटली येथील 56, 22 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 47, 14 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, जिहे येथील 15, 65 वर्षीय पुरुष व 60, 33  वर्षीय महिला. कराड तालुक्यातील  धावरवाडी येथील 14 वर्षीय युवक व 34 वर्षीय महिला, तारुख येथील  31 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 24 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 33 वर्षीय महिला, रेठरे येथील 25 वर्षीय महिला, शेणोली येथील 26 वर्षीय पुरुष,  मलकापुर येथील 51 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, बनपुरी येथील 53 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील नवेचीवाडी वाई येथील 35 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील  निमसोड येथील 33 वर्षीय महिला. कोरेगाव तालुक्यातील  चिलेवाडी भाडळे येथील 30 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील  शिरवळ येथील 82 वर्षीय पुरुष व 65, 23, 45 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील  मल्हारपेठ येथील 16, 14 वर्षीय युवती व 18 वर्षीय युवक,  मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, गारवडे येथील 36 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील  43 वर्षीय महिला, कासाणी येथील 42 वर्षीय पुरुष व 52, 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

४६२ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 30, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 33, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 34, वाई येथील 33, शिरवळ येथील 69, रायगाव येथील 44, पानमळेवाडी येथील 48, मायणी येथील 31, महाबळेश्वर येथे 8,  खावली येथील 54 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 47 असे एकूण 462 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेतलेल्या रेठरे बु.ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, व क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोर्टी ता.कराड येथील 65 वर्षीय पुरुष व निगडी ता.पाटण येथील 75 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

No comments