Header Ads

सोशल मिडीयावर पसरवलेल्या खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा : जिल्हाधिकारी शेखर सिंह satara

सातारा : सोशल मीडियावर फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. "आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश या मथळ्याखाली  सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश, आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते ४ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा इ. अशा आशयाचे खोटे संदेश सोशल मिडीयावरुन प्रसारीत होत आहेत. या प्रकारचे कोणतेही आदेश सद्यस्थितीत सातारा प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या संदेशांबाबत सतर्क राहून त्याला बळी पडू नये असे, आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

No comments