Header Ads

पोवई नाक्यावर पोलिसांकडून वाहकांची लूट; पाटील प्रतिष्ठानचा आरोप satara

सातारा : कोरोना महामारीत सातारकर जनता मेटाकुटीस आली असताना पोलीस दलानेही सातारकरांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी सातारा शहरवासीय संतप्त झाले असून त्यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे आता यावर सातारकरांनी आवाज उठविणे गरजेचे बनले असल्याची भूमिका काहींनी मांडली आहे. पाटील प्रतिष्ठानच्या जयवंत पाटील यांनीही या अनुषंगाने तक्रार केली आहे.

लॉकडाऊन कालावधीत रस्त्यावर दिसणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलीस अडवत होते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसला आहे आणि आजही तो बसत आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या बाजूला पोवई नाक्यावरच हा प्रकार सुरु आहे. पोवई नाका अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी दुचाकी, वाहने अडवून कागदपत्रे दाखवण्यास सांगत होते. कागदपत्रे दाखविल्यानंतर लायसन्स दाखवा, असे सतावले जात होते. याचवेळी पोलिसांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी फोटो काढून लूटच करण्यात येत होती. यामुळे सर्वसामान्य सातारकर नागरिक होरपळून गेला आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा सवालही जयंवत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, याबाबतची विनंती त्यांनी शिवसेनेला केली असून जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या कानावरही हा विषय घातला आहे. त्यामुळे पोलिसांनी चालू केलेली ही लूट थांबवावी, असे आवाहनही जयवंत पाटील यांनी केले आहे.

No comments