Header Ads

कोरोना लढ्यामध्ये आमदार-खासदार यांचे फंड विना अटी-शर्तीचे वापरले गेले पाहिजेत : खा. उदयनराजे satara

सातारा : कोरोनाच्या महामारीत देखील राजधानीचे दिल्ली शहर सुरू ठेवण्यात आलेले आहे, मग साताऱ्यात कशासाठी लॉकडाऊन करण्यात येते. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत केवळ दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासन देत आहे, मला प्रश्न पडतो की दहा ते दोन या वेळेत कोरोना नसतो का ? आणि दोन नंतर तो बाहेर पडतो का ?, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची व्यथा मांडली आहे. तसेच कोरोनाशी लढा देत असताना आर्थिक समस्या पुढे येत आहे, अशा वेळी आमदार-खासदार यांचे फंड या लढ्यामध्ये विना अटी-शर्तीचे वापरले गेले पाहिजेत, असा अशा सूचना देखील उदयनराजे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. खासदार उदयनराजे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉक्टरांसोबत घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, ''कोरोनाशी लढताना लॉकडाऊन हा उपाय नाही. प्रशासन लोकांना किती दिवस दामटून ठेवणार आहे. लोकांनी व्यवसायासाठी बँकांची कर्ज घेतले आहेत. जरी हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असली तरी देखील त्यानंतर त्यांना व्याजासहित कर्जाच्या रकमा भराव्य लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्यांवर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या संख्येपेक्षा कितीतरी पट लोकसंख्या आहे. भविष्यामध्ये चोऱ्यामाऱ्या तसेच इतर गुन्हे वाढू शकतात, हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यांना लक्षणे दिसून आली आहेत. त्यांना सेंटरमध्ये न नेता त्यांना होम कॉरनटाईन होण्यास मुभा देण्यात यावी. कारण कॉरनटाईन सेंटरमध्ये उपासमार होऊ लागली आहे, तसेच एकमेकांच्या संपर्कामुळे त्याठिकाणी कोणाची संसर्ग वाढू शकतो. जिल्हा शासकीय रुग्णालयमध्ये नर्सिंग स्टाफची भरती करणे तसेच तज्ञ फिजिशियन उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे. खासगी तज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी तयार आहेत; परंतु त्यांना अल्प मानधन दिले जाते. त्याउलट खासगी दवाखान्यात चालून त्यांना चांगले पैसे मिळतात, त्यामुळे सरकारनेच आपले धोरण बदलणे गरजेचे आहे. खासगी डॉक्टरांना नेमणूक देताना त्यांना मानधन वाढवून द्यावे, तसेच कंपन्यांचा सीएसआर फंड विरोधातील लढाईत वापरावा. पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री यांच्याकडे लोकांनी लॉकडाऊन बाबतचा तसेच कोरोना वाढीसंदर्भातल्या अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्याबाबत उपाययोजना होताना दिसत नाहीत. या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले या दोघांशीही मी चर्चा करतो नंतर तुम्हाला उत्तर देतो.

No comments