Header Ads

६६ नागरिकांना डिस्चार्ज; ३९ जणांचा अहवाल कोविड बाधित; ५०५ नमुने पाठविले तपासणीला तर ४ रुग्णांचा मृत्यू satara

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ६६ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिवरळ येथील कबुले आळी येथील १६,१७ वर्षीय तरुण व २२, ४५ वर्षीय महिला, भगवा चौक येथील ५० वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील  कास येथील 53 वर्षीय पुरुष, सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, 35, 31, 42, 72, 21 व 23 वर्षीय महिला, सायगाव येथील पोलीस कर्मचारी 51 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 60 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील पसरणी येथील 65 वर्षीय महिला,40 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील 36 वर्षीय महिला व 14 वर्षाची तरुणी. सातारा तालुक्यातील जिहे येथील 60 वर्षीय महिला, शिरगाव येथील 40,69 वर्षीय  पुरुष, 5 वर्षाचा बालक, बोरगाव येथील 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 44, 45 वर्षीय महिला व 51,15,77 वर्षीय पुरुष, करंजे सातारा येथील 45,25,23 व 56 वर्षीय महिला, खावली येथील 60 वर्षीय महिला, रॉयल सिटी येथील 35 व 58 वर्षीय महिला व 8 वर्षाची बालीका, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील शेणवडी (कुंभारगांव) येथील 45 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 40 व 23 वर्षीय महिला, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय तरुणी, तारुख येथील 57 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 30 वर्षीय महिला, बनवडी येथील 13 व 11 वर्षाच्या मुली, 7 व 14 वर्षाची मुले, धावरववाडी येथील 8 वर्षाचा मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय महिला, येलगाव येथील 58 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील 16 व 14 वर्षीय तरुण. फलटण तालुक्यातील मलठण येथील 58 वर्षीय पुरुष, सरडे येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आसू येथील 22 वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील 6 व 13 वर्षाची मुलगी, साखरवाडी येथील  45 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 45 वर्षीय महिला.

५०५ जणांचे नमुने पाठविले  तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगांव येथील 32, वाई येथील 31, शिरवळ येथील 44,रायगांव येथील 44, पानमळेवाडी येथील 24, मायणी येथील 26, महाबळेश्वर येथील 7, पाटण येथील 23, दहिवडी येथील 27, खावली येथील 40 व  कृष्णा मेडिकल कॉलजे कराड येथील 94 असे एकूण 505 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन  पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

३९ जणांचा अहवाल कोविड बाधित

कराड तालुक्यातील किवळ येथील  5, मलकापुर, वहागाव, पाचवड, निगडी, चाळकेवाडी व कराड येथील 1, व खोडशी येथील 2, फलटण तालुकयातील फलटण येथील 5, विंचुर्णी येथील 12, मलटण, भाडळी बु., वाखरी, कोळखी, सासवड, मिरडे येथील प्रत्येकी 1, व खंडाळा तालुक्यातील खंडाळायेथील 2, शिरवळ येथील  1 असे एकुण 39 जण कोविड बाधित असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे.यामध्ये कराड तालुक्यातील किवळ येथील 36,69,31 वर्षीय पुरुष, 32,56 वर्षीय महिला,  मलकापुर येथील 36 वर्षीय पुरुष, खांडशी येथील 62 वर्षीय महिला व 32वर्षीय महिला, वहागाव येथील 44 वर्षीय महिला, पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, निगडी येथील 46 वर्षीय महिला, चाळकेवाडी येथील  51 वर्षीय पुरुष, तर कराड येथील 62 वर्षीय पुरुष. फलटण तालुक्यातील विंचुर्णी येथील 40, 40, 70,45,22 वर्षीय महिला व 19, 17, 19 वर्षीय तरुण व 10 वर्षाचा मुलगा , 13 वर्षाचा मुलगा व 20,21 वर्षीय तरुण, रावडी खु. येथील 34 वर्षीय पुरुष, सगुणामाता नगर येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळी येथील  38 वर्षीय पुरुष,  वाखरी येथील 46 वर्षीय पुरुष, फलटण येथील 43 व 55, 60 वर्षीय पुरुष,  कोळकी येथील 58 वर्षीय पुरुष, मलटण येथील 27 वर्षीय पुरुष, सासवड येथील 25 वर्षीय महिला, मिरडे येथील 45 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील  खंडाळा येथील 23व 47 वर्षीय पुरुष, अहिरे येथील 37 वर्षीय पुरुष.

४ रुग्णांचा मृत्यू

संचेती हॉस्पिटल वाई येथे पसरणी ता. वाई येथील 87 वर्षीय पुरुष व जावळे ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष दोन कोविड बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे खाजगी प्रयोगशाळेत  तपासणीत कोविड बाधित आलेला विखले ता. खटाव येथील 77 वर्षीय पुरुषाचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हा रुग्णालय सातरा येथे कोरेगांव येथील 75 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

No comments