Header Ads

सहा वर्षांपासून कोयना धरण पायथा विजगृह डाव्या तिराचे काम बंद; श्रमिक मुक्ती दलाचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन satara

पाटण : गेले सहा वर्षांपासून शासकीय अडचणींमुळे कोयना धरण पायथा विजगृह डाव्या तिराचे काम बंद असल्याने त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगारांवर कोरोनोच्या ऐन संकटात उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सबंधित विभागाला योग्य सुचना देऊन प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे पाटण तालुका श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आले असून, या निवेदनावर श्रमिक मुक्ती दलाचे चैतन्य दळवी, सचिन कदम, महेश शेलार, यांच्या सह अन्य सदस्यांच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात असलेला कोयना विज प्रकल्प हा कमी खर्चात जास्त फायदा मिळवून देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तयार होणाऱ्या वीजे मुळे महाराष्ट्र राज्य प्रकाशमान होऊन येथील कृषी औद्योगिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र गेले पाच सहा वर्षे येथे चालू असलेल्या कोयना धरण पायथा विजगृह डाव्या तीराचा विज निर्मिती प्रकल्प काही शासकीय अडचणींमुळे २०१४ पासून बंद असल्यामुळे या या ठिकाणी कार्यरत असलेल्या कोयना विभागातील ६०/७० गावांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच कोरोनोच्या महामारीमुळे कोयना विभागात मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी परतले आहेत. मात्र याठिकाणी कोणताही रोजगार नसल्यामुळे त्यांचेवर जगायचे कसे असा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाला कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा कोयना प्रकल्पग्रस्त असुन शासनाने हा बंद झालेल्या डाव्या तीर वीजनिर्मितीचे काम सुरू करण्याबाबत सबंधित विभागाला योग्य आदेश देऊन आपले सर्वस्व या प्रकल्पासाठी देणा-या कोयना विभागातील गोरगरीब जनतेला तालुक्यातच रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

No comments