Header Ads

जिल्ह्यातील ४८ नवे कोरोनाग्रस्त; २९८ रिपोर्ट निगेटिव्ह तर एका बाधिताचा मृत्यु satara

सातारा : जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण  48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच एन.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २९८ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आज पहाटे कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.

बाधीतांमध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34  वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती. पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका.  सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष. माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कानरवाडी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला. फलटण  तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष,  आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष. जावळी तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

No comments