Header Ads

साताऱ्यात शाळा, विद्यालयांचा शैक्षणिक फी भरण्यासाठी तगादा; शासनाच्या आदेशाची पायमल्ली : रमेश उबाळे satara

कोरेगाव : कोरोनामुळे गेली तीन महिने हाताला काम नाही. अनेक कुटूंब मेटाकुटीला आले असतानाच ऑनलाइन क्लालासेसच्या कारण पुढे करून सातारा शहर तसेच उपनगरातील शाळा पालकांच्या मागे फी भरण्याचा तगादा लावल्याने  पालकवर्गामध्ये घाबराट निर्माण झाली असून, मुलांना शाळा शिकवावी की नाही अशा मनस्थितीत पालकवर्ग आहे असे मत  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी व्यक्त केले असून, याबाबत आपण जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिल्याचे ते म्हणाले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक उद्दोग, धंदे बंद अवस्थेत आहेत. लोकांच्या हाताला काम नसल्याने सद्यस्थितीत लोकांच्या उपजीविकेचे साधन उरले नाही. यामुळे लोक आर्थिक संकटात आहेत. याची गंभीर दखल घेऊन शसनाने दि.8.05.2020 रोजी पालकांकडे शैक्षणिक फी चा तगादा न लावण्याचे आदेशित केले आहे. तथापी असे निदर्शनास आले आहे की, शसनाच्या आदेशाची सातारा शहरातील व उपनगरातील शाळा, विद्यालय पायमल्ली करत आहेत. असे निवेदनात उबाळे यांनी नमूद केले आहे. ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली पालकांच्या पाठीमागे तगादा लावला असून आपण यामध्ये लक्ष घालून आपल्या स्तरावर संबधित शाळांना योग्य निर्देश द्यावेत अशी आपणास विनंती आहे. असेही निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे. निवेदनावर रमेश उबाळे यांची सही असून पुढील कार्यवाहीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पंचायत समिती सातारा यांनाही निवेदनाच्या प्रति पाठविल्या आहेत.

मंत्री वर्षा गायकवाड लक्ष घालतील-उबाळे 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या आपल्या जिल्ह्यातील असून त्यांना निवेदन दिले असून त्या आपल्या निवेदनाची दखल घेऊन जातीने लक्ष घालून पालकांवर होत असलेला अन्याय थांबवुन न्याय देतील. अशी अपेक्षा रमेश उबाळे यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच रमेश उबाळे यांनी सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. सध्या उबाळे हे वैयक्तिक कामानिमित्त पुणे येथे आहेत. त्यांना सातारा शहर व उपनगरातून अनेक पालकांनी भ्रमण ध्वनीवर शाळा, विद्यालयाच्या शैक्षणिक फी संदर्भात संपर्क केल्यानंतर त्यांनी तत्परता दाखवूत थेट मेल करून शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे.

No comments