Header Ads

त्रासाला कंटाळून दोघांनी केला एकाचा धारदार शस्त्राने खून satara

सातारा : वडूथ (ता. सातारा) येथे मंगळवारी रात्री दोघांनी एकाचा धारदार शस्त्राने खून केला. घटनेत मृताचा पाय कापला गेल्याने रक्ताचा सडा पडलेला आहे. दरम्यान, हादरवून सोडणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सचिन पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, सचिन पवार हा परिसरात काही जणांना त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून दोघांनी मंगळवारी रात्री खून केला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.

No comments