Header Ads

राजगृहावर हल्ला म्हणजे शिवरायांच्या विचारांवर आघात : डॉ.राजेंद्र गवई satara

सातारा : ज्या ज्या वेळी राज्यात दंगलसदृश्य स्थिती निर्माण करावयाची असते त्या त्या वेळी समाज कंटकांचा अशा भ्याड हल्यासाठी वापर केला जातो. राजगृहावर हल्ला हा त्यातलाच प्रकार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध नोंदवत असल्याचे मत रिपाईचे राष्ट्रीय नेते डॉ.राजेंद्र गवई यांनी नोंदवले आहे. राजगृह हल्ल्याप्रकरणी त्यांनी राजगृहावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. ए.सि.पी. त्रिपाठींच्या उपस्थितीत सदर प्रकरणी गवई यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता पोलीस यंत्रणेकडून तात्काळ तपास होऊन आरोपीना अटक करण्याची ग्वाही देत सदर दुरध्वनीवरून त्यांनी भिमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकरा यांचेशीही सविस्तर चर्चा केली.

जय भवानी,जय शिवाजी या घोषणेने मानव मुक्तीच्या लढ्याला सुरवात करणाऱ्या बाबासाहेबांनी उभारलेल्या पुस्तकांच्या घरावरच भ्याड हल्ला म्हणजे छ. शिवरायांच्या विचारावरच आघात करण्याचा हा निंदनीय प्रकार असल्याने त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच असल्याचे सांगत तमाम आंबेडकर अनुयायांनी संयम राखावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. राजगृह भेटी प्रसंगी त्यांचे सोबत रिपाईचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आनंद खरात उपस्थित होते.

No comments