Header Ads

उद्यापासून सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट व दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ सुरू; नागरीकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन satara

सातारा : सातारा जिल्हा १७ ते २६ जूलैपर्यंत लॉकडाउन करण्यात आला होता. आज रविवार दि. २६ रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हा अंशतः अनलॉक केला आहे. नव्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेतच सुरू ठेवाण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, नागरीकांनी विनाकारण बाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आलेले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात लॉकडाउन करण्यात आले होते. त्याची मुदत आज रविवारी संपली. उद्यापासून सोमवार दि.२७ पासून सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानांबाबत तेथील प्रांताधिकारी निर्णय घेतील असे नव्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त २० पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधु,वर, वधु-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहिण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  चे कलम ५१, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

No comments