Header Ads

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यायाच्या २ महत्वाच्या बैठका आणि ''यांची'' गैरहजेरी satara

सातारा : सातारा जिल्हावासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यायाच्या अत्यंत महत्वाच्या २ बैठका ४ दिवसात पार पडल्या. मात्र कोरेगाव मतदार संघातील जागेत होणाऱ्या या बैठकीला सातारा-कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाचे आ.महेश शिंदे हे अनुपस्थितीत राहिले. तसेच ना.शंभूराज देसाई, माण-खटावचे आ.जयकुमार गोरे, आ.पृथ्वीराज चव्हाण व फलटण विधानसभा मतदार संघाचे आ.दीपक चव्हाण यांनी देखील सातारा व मुंबई येथील बैठकीला दांडी मारली आहे. दरम्यान, नुकतेच सातारा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लवकरात लवकर साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यायाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ दिवसात महत्वाच्या २ बैठका झाल्या व महाविद्यायाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. आज विधान भवनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.

सातारा बैठक उपस्थिती :- जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील, खा.श्रीनिवास पाटील, आ.शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील.         

सातारा बैठक अनुपस्थिती :- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे, आ.जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.महादेव जाणकर.  

मुंबई बैठक उपस्थिती :- जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील (व्हीसीद्वारे), आ.शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे.

मुंबई बैठक अनुपस्थिती :- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.महेश शिंदे, आ.महादेव जाणकर.

No comments