Header Ads

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक रस्त्यावर; पेट्रोल पंपावर केले अनोखे आंदोलन satara

सातारा : केंद्र शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे डिझेल व पेट्रोलची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. सामान्य नागरिक कोरोना आणि या इंधनाच्या माहागाईमुळे त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारला सामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देन-घेण नाही. केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी अन्यथा पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दिला आहे. केंद्र सरकारने इंधनाचे वाढते दर मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्यावतीने पोवई नाक्यावरील पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी तेजस शिंदे बोलत होते. यावेळी राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे, पारिजात दळवी, नाना इंदलकर, राजेंद्र लावांघरे, अतुल शिंदे, मंगेश ढाणे, अजित बर्गे, निवास शिंदे, अशोक जाधव, सामिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, कुसुम भोसले, सीमा जाधव तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
आज डिझेलची दरवाढ होऊन डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी असताना भाजप सरकारने इंधन दरवाढ का केली आहे. याचे उत्तर त्यांनी सामान्य नागरिकांना दिले पाहिजे. डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना व छोट्या-मोठ्या उद्योजकांना बसणार आहे. कारण शेतकरी व उद्योजक डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे प्रवास खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका महागाईद्वारे नागरिकांना सहन करावा लागत आहे. सरकारने डिझेल पेट्रोलची दरवाढ करून नागरिकांवर हा अमानुष कर लादलेला आहे. मध्यमवर्गीयाचं कंबरडं मोडणारी, पेट्रोल डिझेल दरवाढ झाली असल्याने भविष्य काळात देखील महागाई वाढणार आहे. वेगवेगळ्या प्रकरणात केवळ दिशाभूल करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आंदोलन करणारे भाजप आता का बोलत नाही ? असा सवाल देखील तेजस शिंदे यांनी भाजप सरकारला विचारला आहे.

इंधन दरवाढीचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले. यावेळी युवकांच्या विविध प्रश्नांवर तेजस शिंदे यांनी चर्चा केली. राज्यशासनाने विविध परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. त्या अनुषंगाने युवकांना अभ्यासिका उपलब्ध नसल्याच्या भरपूर तक्रारी असून आपण तात्काळ अभ्यासिका सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी तेजस शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली.   

No comments