Header Ads

जिल्ह्यातील ८६ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; ३ बाधितांचा मृत्यू satara

सातारा : काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील ८६ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :- कराड तालुक्यातील कालवडे येथील 60, 65, 40 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 45 वर्षीय महिला, टेंभू येथील 40 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 24 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय महिला, शामगाव येथील 76 वर्षीय पुरुष, रेठरे येथील 29 वर्षीय पुरुष, रेठरे बु. येथील 26, 60 वर्षीय पुरुष.

पाटण तालुक्यातील माहिंद येथील 55 वर्षीय महिला, खाले येथील 31 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, तारळे येथील 22 वर्षीय महिला, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष.

कोरेगांव तालुक्यातील बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 61,63,37,48,27,37 वर्षीय महिला व 39 व 63 वर्षीय पुरुष.

सातारा सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, जिहे येथील 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 55, 46 वर्षीय पुरुष, देगांवरोड येथील 39 वर्षीय पुरुष, शांतीनगर येथील 52 वर्षीय पुरुष.

माण तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष, आंधळी येथील 60 वर्षीय पुरुष.

फलटण  तालुक्यातील शिवाजी नगर येथील 32 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान येथील 29 व 24 वर्षीय महिला, कोळकी येथील 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचा बालक, 33,60 वर्षाची महिला व 3 वर्षाची बालीका, जिंती नाका येथील 36 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 33 वर्षीय महिलाव 58 वर्षीय पुरुष.

खटाव तालुक्यातील अंबवडे येथील 27 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष, खतगुण येथील 85 वर्षीय महिला.

वाई तालुक्यातील भूईंज येथील 32 वर्षीय पुरुष, परखंडी येथील 57 वर्षीय महिला व 37 वर्षीय पुरुष व 11 वर्षाचे बालक,  पसरणी येथील 67 वर्षीय महिला,  11 व 14 वर्षीय बालक व 36,76,39 वर्षीय पुरुष, वाई येथील 40 वर्षीय पुरुष व 63 वर्षीय महिला, परखंडी येथील 70 वर्षीय दोन पुरुष,सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 52 वर्षीय पुरुष, गोडवली (पाचगणी) येथील 40,23 वर्षीय पुरुष व 13 व 17 वर्षीय बालक.

जावली तालुक्यातील सायगाव येथील 22, 34  वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, 57 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातील विंग येथील 34 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 37,28 वर्षीय पुरुष 10 वर्षाची बालीका, खंडाळा येथील 34 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक व 8 वर्षाची बालीका, काझी कॉलनी शिरवळ येथील 39 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 55 वर्षीय महिला, मावशी येथील 41,65 वर्षीय महिला.

3 बाधितांचा मृत्यू

तसेच शारदा हॉस्पिटल कराड येथे बुधवार पेठ ता. कराड येथील 53 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे अहिरे ता. खंडाळा येथील 77 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खालगी प्रयोगशाळेत तपासणीत कोविड बाधित आलेला गुरुवार पेठ सातरा येथील 72 वर्षीय पुरुषाचा  अशा 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

No comments