Header Ads

ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी पोलीस पाटील यांना प्राधान्य द्या : प्रकाश गायकवाड satara

सातारा : सातारा  जिल्हयात सप्टेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत, यात पारदर्शक व्यवहारासाठी पोलीस पाटील  यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हाप्रमुख प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कोरोणाचा पार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवङणुका पुढे ढकल्या आहेत. आता ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी अनेकांनी मोर्चे बांधनी सुरू केली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली तर ग्राम विकासात अङथळा येऊ शकतो, प्रशासक काळात काम करताना राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यास त्यास गावातून विरोध होऊ शकतो हा नको, तो नको, यातून गावात तंटे-वाद होण्याची शक्यता आहे. शिवाय कोरोना जनजागृती समितीत शासनाने नेमून दिलेले कामी विशेष करून पोलीस पाटील यांनी पण महत्वाची भुमिका निभावली आहे. पोलीस पाटील यांनी कोरोना बाबत ग्रामस्थांशी व प्रशासनांशी चांगला समन्वय ठेवला आहे व कोरोनाचे संकट कायम असल्याने ग्रामपंचायतच्या प्रशासकपदी पोलीस पाटील यांची नियुक्ती झाल्यास पारदर्शकपणे कारभार होऊ शकतो शिवाय ग्रामस्थांना न्याय देण्याचे काम होणार आहे असे प्रकाश गायकवाड यांनी म्हटले आहे.

No comments