Header Ads

बैल बेंदूर सणावर करोनाचे संकट, घरोघरी झाले सर्जा-राजा चे पूजन satara

सातारा : वर्षभर शेतीच्या मशागती आपल्याला साथ देणाऱ्या लाडक्या शेतकरी राजाच्या सर्जा-राजा या बैलजोडीचा सण म्हणजे बेंदूर. आज शनिवारी मूळ नक्षत्रावर दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. मात्र यावर्षी करोनाचे संकट असल्यामुळे शेतकरी बांधवांनी हा सण आपल्या घरोघरी साजरा केला. सकाळी लवकर घरात असलेल्या बैलजोडयांना गरम पाण्याने नाहूमाखू घालन्यात आले. त्यानंतर त्यांना विविध रंगांनी सजवण्यात आले. बैलांची शिंगे बेगडणी सजवली गेली. त्यांना झुली घालण्यात आल्या. हळद-कुंकू वाहून या वृषभ देवांची पूजा करण्यात आली.

घरात केलेला पुरणपोळीचा गोडाचा नैवेद्य ही खाऊ घालण्यात आला. मात्र यावर्षी मिरवणुका काढता येत नसल्यामुळे अनेक बैल मालकांनी आपली बैले घरातच पूजन  करून त्यांच्यासोबत दिवसभर थांबून फोटोसेशनचा आनंद लुटला. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात आणि विविध रंगांची गुलालाची उधळण करत सातारा शहरात काढल्या जाणाऱ्या मिरवणुका पाहायला मिळाल्या नाहीत. या करोनामुळे हा वर्षातला बैलांचा आनंदाने साजरा होणारा सण मात्र अनेकांना खऱ्या अर्थाने साजरा करता आला नाही याचे दुःख होत असल्याचे सुप्रसिद्ध बैलप्रेमी व वजीर ग्रुपचे सर्वेसर्वा अक्षय मोरे यांनी सांगितले.

No comments