Header Ads

६५ नागरिकांना दिला डिस्चार्ज; ५७२ जणांचे नमुने तपासणीला satara

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 65 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये जावली तालुक्यातील   पुनवडी येथील वय 60, 50, 56,59, 24, 5, 42, 55, 13, 3, 7,70 वर्षीय महिला व वय 55, 24, 22, 31, 30, 63, 27, 10, 60, 38, 34, 11, 5, 19, 7, 21, 17 वर्षीय पुरुष.  सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथील 46 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील भैराबा पायथा येथील 50 वर्षीय पुरुष, विमल सिटी राधिका रोड येथील वय 30, 56, 27 वर्षीय महिला, सदर बझार येथील 56 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील  तळबीड येथील वय 10, 9, 30, 27, वर्षीय महिला व वय 40, 5, 35 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 19 वर्षीय युवक, मलकापूर येथील महिला, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 26 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील पोलीस लाईन सोनगिरवाडी येथील 36, 45 वर्षीय महिला व 15, 24, 40 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील  उफळे येथील 45 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील  शिरवळ येथील 65, 41 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, रिएटर इंडीया कंपनी विंग खंडाळा येथील वय 30, 39, 40, 48 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 42 वर्षीय पुरुष, कासाणी येथील 38, 35 वर्षीय पुरुष व 35, 27 वर्षीय महिला. माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवती व 16 वर्षीय युवक.

५७२ जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 35, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 60, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 36, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 33, वाई येथील 68, शिरवळ येथील 60, रायगाव येथील 28, पानमळेवाडी येथील 53, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथे 12, पाटण येथील 64, दहिवडी येथील 13,  खावली येथील 23 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 60 असे एकूण 572 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

No comments