Header Ads

सातारा जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट कीट तातडीने उपलब्ध करा : गोरखनाथ नालावडे satara

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक प्रदेशचे सरचिटणीस गोरखनाथ नालावडे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अतुल शिंदे, मंगेश ढाणे, शुभम साळुंखे तसेच राष्ट्रवादी विध्यार्थी व युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट कीट उपलब्ध केल्यास रुग्ण कोरोन बाधित आहे की नाही याचा अहवाल त्वरित मिळेल व कोरोना बाधित क्षेत्रामध्ये याचा अधिक उपयोग होऊन रुग्णावरील उपचार देखील लवकर सुरु करता येतील. त्यानुसार, प्रशासनाने तात्काळ सातारा जिल्ह्यात कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस गोरखनाथ नालावडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे  निवेदनाद्वारे केली आहे. रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किटचा अहवाल लवकर येतो. परिणामी, प्रशासनाला कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करता येईल, असे मत यावेळी नलावडे यांनी व्यक्त केले.

No comments