Header Ads

पाटण तालुक्यात सेना, राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी; ११ जणांना अटक patan

पाटण : शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटांमध्ये झालेले भांडण व त्यावरून पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून बाजे ता.पाटण येथे दोन गटांत पुन्हा जोरदार मारामारी झाली. या प्रकरणी कोयना पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, कोयना पोलिसांनी  दोन्ही गटांतील ११ जणांना नुकतीच अटक केली आहे.

याबाबत कोयना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजे गावात नुकतीच दोन गटांत मागील भांडणावरून व त्या भांडणाची तक्रार पोलिसात दिल्याच्या कारणावरून पुन्हा भांडणे झाली. दोन्ही गटाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी एकमेकांस मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोयना पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. कोयना पोलिसांनी याप्रकरणी रघुनाथ वाजू मोरे (41), विलास संपत मोरे (34), संजय रामचंद्र मोरे (39), अरविंद धोंडीराम मोरे (31), सीताराम भागोजी मोरे (55), रामचंद्र भागोजी मोरे (70), विशाल मारुती सुर्वे (19), अजित रामचंद्र पाटील (20), सुनील बाळू बाबर (30), अमित रामचंद्र पाटील (27), प्रकाश लक्ष्मण मोरे (30) या दोन्ही गटांतील 11 जणांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश भाविकट्टी तपास करत आहेत.

No comments