Header Ads

जंगली श्वापदाच्या हल्ल्यात म्हैस मृत्युमुखी; पाटण तालुक्यातील पांढरेपाणी येथील घटना patan

पाटण : पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या पांढरेपाणी या गावातील शेतकरी दगडू शेळके याचीं दुभती म्हैस जंगली श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. ऐन कोरोना महामारीच्या काळात म्हैस मृत्युमुखी पडल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे गरीब शेतकरी दगडू शेळके यांचेवर दुखाचा डोगंर कोसळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पांढरेपाणी येथील शेतकरी दगडू नाऊ शेळके हे शनिवारी नेहमी प्रमाणे आपली जनावरे चारण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलाकडे घेऊन गेले होते. यावेळी जनावरे चरत असताना अचानक म्हैशीवर जंगली प्राण्याने हल्ला केला. म्हैशीचे लचके तोडल्याने म्हैस मृत्युमुखी पडली. ऐन कोरोनाच्या संकटात दगडू शेळके यांचा कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले दुभते जनावर मृत्युमुखी पडल्याने त्यांचेवर मोठे संकट कोसळले आहे.

No comments