Header Ads

पाटणच्या सपोनि तृप्ती सोनवणे यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती patan

पाटण : पाटण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. तृप्ती सोनवने यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली असून, पदोन्नतीसह त्यांची नागपूर शहर येथे बदली झाली आहे. सातारा जिल्ह्यात पाचगणी, पाटण येथे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे सामान्यांसह पोलीस वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून त्यांना सातत्याने गौरविण्यात आले आहे.

एक वर्षांपुर्वी त्यांनी पाटण येथे स.पो.नि. म्हणून कार्यभार स्वीकारला. पाटण शहराची व्याप्ती व तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे पोलीस निरीक्षकपद कार्यरत असते, परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वि सातपुते यांनी अत्यंत विश्वासाने सोनवने यांचेवर पाटणची जबाबदारी दिली व त्यांनीही तो विश्वास सार्थ केला. तालुक्यातील गतवर्षीच्या अतिवृष्टी, महापूर त्यानंतरची लोकसभा, विधानसभा निवडणुक व सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन, जमावबंदी, संचारबंदी, नाकाबंदी आदीमध्ये त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. ज्या पटीत कारवाया त्याहीपेक्षा अधिक पटीने त्यांनी जनसंपर्क व सामाजिक प्रतिष्ठा संपादित केली. त्यांच्या पदोन्नतीने सौ.सोनावणे यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत असताना त्यांच्या बदलीमुळे पाटण परिसरात जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

No comments