Header Ads

उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर दिली ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा; व्यंकय्या नायडूंनी दिली समज maha

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीत पार पडला. करोनामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनीदेखील खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान शपथ घेताना केलेल्या एका गोष्टीमुळे व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजेंना समज दिली. उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत शपथ घेतली. शपथ संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र; जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. यावर वैंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे, हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही आहे. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. भविष्यात हे लक्षात ठेवा’, अशी समज यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दिली.

No comments