Header Ads

शिवरायांचा अपमान झाला असता तर ऐकून घेतलं असतं का? तिथेच राजीनामा दिला असता : खा. उदयनराजे maha

नवी दिल्ली : "छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही," अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते श्री.छ.उदयनराजे यांनी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही  प्रकारे महाराजांचा अपमान झाला ही. याच्याएवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले. माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त नायडू म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. राज्यघटनुसार अशा घोषणा देता येणार असं त्यांनी सांगितलं. यानंतर व्यंकय्या नायडूंनी घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचं सांगितलं. आदरणीय शरद पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा. जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे," असे उदयनराजे म्हणाले.

No comments