Header Ads

राज्यसभा खासदारांचा शपथविधी; शरद पवार यांनी हिंदीतून तर उदयनराजेंनी घेतली इंग्लिशमध्ये शपथ maha

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा राज्यसभेत न होता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडला. देशभरातून २० राज्यांमध्ये निवडून आलेल्या ६२ खासदारांचा शपथविधी आज पार पडला. जे खासदार आज शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचा शपथविधी अधिवेशनाच्या वेळी पार पडणार आहे. आज ज्या खासदारांनी शपथ घेतली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे भागवत कराड यांचा समावेश होता.

राज्यसभेऐवजी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचा हात धरलेल्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे भागवत कराड, शरद पवार आणि भाजपच्या उदयनराजे यांनी शपथ घेतली. यापैकी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली. तसेच पक्षांतर करून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. तसेच शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भवानी जय शिवाजी ची घोषणाही केली.

महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली शपथ : शरद पवार, उदयनराजे भोसले, प्रियांका चतुर्वेदी, भागवत कराड, राजीव सातव, रामदास आठवले.

No comments