Header Ads

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस दल अहोरात्र प्रयत्नशील; ना. शंभूराज देसाई यांनी घेतली लोणंद येथे आढावा बैठक khandala

लोणंद : राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे आज दि. २१ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांनी लोणंद येथे आढावा बैठक घेतली तसेच पाडेगाव टोलनाक्यावर भेट देऊन पाहणी केली. ना. शंभूराजे देसाई यांनी आपल्या दौर्‍या दरम्यान लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात आढावा बैठक घेऊन सद्य स्थितीत कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाला सूचना देऊन कामाची माहिती घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधे चांगला समन्वय असल्याचे सांगितले व १७ तारखेपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचे नागरिक चांगले पालन करतं आहेत तसेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलिस दल २४x७ अहोरात्र प्रयत्नशील आहे. तसेच त्यांना महसूल विभाग आणि शिक्षक सुद्धा या कामात मदत करत असल्याचे सांगितले.

शिरवळ परिसरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना बाधीतांची संख्या रोखण्यासाठी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी प्रांताधिकार्‍यांना विभागातील कंपन्यात बाहेरून येणार्‍या कामगारांचा स्वॅब घेऊन तपासणी करून मगच कंपनीत घेण्याची सूचना केली असल्याचे सांगून कंपनीने कामगारांना कंपनीच्या जवळच राहण्यासाठी सोय उपलब्ध करण्यास सांगितले असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर त्यांनी सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील पाडेगाव टोलनाक्याला भेट देऊन तेथील कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या कामाचा गौरव केला. यावेळी त्यांच्या समवेत आ. मकरंद पाटील, नितीन भरगुडे-पाटील, वाईच्या प्रांतअधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, नगराध्यक्ष सचिन शेळके,  नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, अजित यादव, प्रदीप माने, हर्षवर्धन शेळके पाटील, डॉ मिलिंद काकडे, अवधुत किकले, राहुल क्षिरसागर, तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, गणेश जाधव, प्रमोद शिंदे, लक्ष्मण जाधव, हेमंत पवार, अविनाश नलवडे, जगन्नाथ यादव, शंभूराजे भोसले, प्रणव यादव उपस्थित होते.

No comments