Header Ads

राज्य शासनाने खासगी दवाखान्यातील सुविधा पाहून निधी देणे आवश्यक : आ.चंद्रकांत पाटील karad

कराड : राज्य शासनाने कृष्णा हॉस्पिटलला अद्याप एक रूपयाही दिलेला नाही. देश हितासासाठी पदरमोड करून कृष्णासह रूबी, दिनानाथ हॉस्पिटलसह राज्यातील खासगी दवाखाने रूग्णांवर उपचार करत आहे. त्यामुळेच राज्य शासनाने खासगी दवाखान्यातील सुविधा पाहून निधी देणे आवश्यक आहे. असे झाल्यास लोकांना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. आ.चंद्रकांत पाटील यांनी गुरूवार (ता.२३) कराडमधील कृष्णा हॉस्पिटलला भेट देत कोरोनाबाबत डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आ.पाटील म्हणाले, राज्य शासन आणि प्रशासन गेली चार महिने कोरोनाशी झुंज देत आहे. आता क्वारंटाईन सेंटरबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे समाजिक संस्थांसह समाजानेही आता पुढाकार घेत प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे. लक्षणे नसणार्‍या रूग्णांसह क्वारंटाईन केल्या जाणार्‍या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी समाज पुढे आल्यास ज्या रूग्णांना उपचारांची गरज आहे, त्यांच्यावर उपचार करण्यास शासनाला मदतच होणार असल्याचे आ.पाटील म्हणाले.

No comments