Header Ads

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कोरोना पॉझिटिव्ह karad

कराड : कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बाधितांच्या आकड्यासह बळींचाही आलेख वाढतच आहे. सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असताना मंगळवारी आणखी दोघांचा बळी गेला आहे. चार दिवसांत तब्बल 13 जणांचे बळी गेले असून बळींची संख्या 87 झाली आहे. तर 91 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा 2640 झाला आहे. दरम्यान, मंगळवारी 69 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांचीही दीड हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

No comments