Header Ads

वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन काळाची गरज : सौ. वेदांतिकाराजे

सातारा : वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन तसेच प्लॉस्टिकचा वापर पूर्णतः टाळल्यास पर्यावरण संतुलन राखण्यात निश्चितच मदत होईल. दिवसेंदिवस होणाऱ्या बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा ढळत चललेला समतोल गखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन, संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन  विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भासले यांनी केले. अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. पॉलिटेक्निक, शाहुनगर शेंद्रे येथे तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये सौ. वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थित वृक्षारोपनाचा कार्यक्रम  झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने वृक्षारोपण करतांना सोशल डिस्टनिंग, मास्क सानिटायर्झर वापर या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. 

पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगसाख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. यासाठी वृक्षारोपण आणि झाडांचे संगोपन हा पर्याय आहे. याच उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये करण्यात आली. पर्यावरणाचा -हास रोखत प्रदुषणाला आळा घालण्याचा उदात्त हेतु डोळयासमोर ठेवून अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतनमध्ये दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. यू. धुमाळ, उपप्राचार्य आर. डी. नलवडे सर्व विभागप्रमुख, कार्यालयीन अधिक्षक एस. एस. भोसले, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अभयासिंहराजे भोसल तंत्रनिकेतनमध्ये एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबवला आहे. विविध सहकारी संस्था सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यक्तींनी वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भासेल यांनी यावेळी केले. 

No comments