Header Ads

डिझेलची दरवाढ होऊन डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले, गेल्या ७० वर्षात पहिल्यांदाच असे घडले : आ.पृथ्वीराज चव्हाण satara

सातारा : आज डिझेलची दरवाढ होऊन डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. हे गेल्या ७० वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे. डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण शेतकरी डिझेलचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे प्रवास खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका महागाईद्वारे नागरिकांना सहन करावा लागत आहे. सरकारने नागरिकांवर लादलेला हा जिझीया कर असल्याची टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन झाल्यानंतर काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत-चीन मुद्दा हा देश हिताशी संबंधित आहे, हे काही आमच्या घरचे काम नाही. त्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर जनतेच्या भावना मांडणारच. या प्रश्नी आम्ही राजकारण करत नसून सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडत आहोत. भारत-चीन मुद्यावर लोकभावना व्यक्त करण्याचे काम काँग्रेस करणारच असल्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

No comments