Header Ads

शेतकऱ्यांना बांधावरच खते बियाणे मिळतील; कोरोनावर मात करण्यासाठी खबरदारी घ्या : आ. शिवेंद्रराजे satara

सातारा : सध्या जगभर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे सर्वजण तणावाखाली आहेत. आपल्या परळी ठोसेघर भागात तर शेतीचा हंगाम उंबरठयावर येऊन थांबला आहे. या संकटामुळे शेतकऱयांची द्वीधा मनस्थिती झाली आहे. मात्र असे विचलीत होऊ नका. कोरोनाचे संकट असेच सुरु राहीले तरी शेतीही पडू द्यायची नाही आपली स्वत:ची काळजी घेत कुटूंब सावरायचे आहे, असा सबुरीचा आणि आत्मियतेचा सल्ला देत आ. श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी परळी, ठोसेघर परिसरातील कंटेंन्टमेंट झोन मधील ग्रामस्थांना दिला. आ. शिवेंद्रराजे यांनी परळी, ठोसेघर येथील कंटेन्मेंट झोनमधील गावांची पाहणी केली आणि ग्रामस्थ व शेतकऱ्यांना धीर दिला.  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजु भोसले, गटविकास अधिकारी संजय धुमाळ, तालुका वैद्यकिय अधिकारी डि.जी. पवार, विस्ताराधिकारी शंतनु राक्षे, परळीचे वैद्यकिय अधिकारी सचिन यादव, ठोसेघरचे वैद्यकिय अधिकीरी मानसी पाटील, कृषीअधीकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

परळी भागात 9 गावांमधून 21 कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने भागात एकच खळबळ उडाली होती. ही गावे कंटेंन्टमेंट झोनमध्ये गेल्याने गावातील शेतकरी हवालदील झाले होते. जर गावात शेतीसाठी बि-बियाणे, खते कशी उपलब्ध करायची पिकांची औषध फवारणी या समस्या शेतकऱ्यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यासमोर मांडल्या. या सर्व अडीअडचणी ऐकल्यावर त्यांनी तत्काळ उपस्थित अधिकाऱ्याना सुचना करत परळी ठोसेघर परिसरातील वाडय़ावस्त्या तसेच गावामध्ये खते बि-बियाणे उपलब्ध करुन द्यायच्या सुचना केल्या. शेतकऱ्याना कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासू नयेत काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क करा असे सांगून त्यांनी कोरोना बाधीत कंटेंन्टमेंट झोनमधील गावांची माहिती घेतली. जी कुंटुंबे शाळेत मंदीरात मुक्कामी आले आहेत. त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात. मुंबईवाले हे आपलेच बांधव आहेत. त्यांचा तिरस्कार करु नका. योग्य खबरदारी घेतली तर हे संकट लवकरच दुर होईल. अशी आशा करत आ. शिवेंद्रराजे यांनी ग्रामस्थांचे मनोबल वाढवले.

No comments