Header Ads

जवळवाडी येथे तंबाखू विरोधी दिनानिमित्त युवकांची प्रबोधन फेरी satara

सातारा : जवळवाडी ता.जावली येथिल ग्रामपंचायतीच्या वतीने ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्तीचा संकल्प करण्यात आला. यावेळी गावातील युवकांनी प्रबोधन फेरी काढून ग्रामस्थ व महिलांमधे जनजागृती केली. दिवसेंदिवस व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे लाखो लोकं कॅन्सरपिढीत होत आहेत. यामधे भारतात लाखो लोकांचा मृत्यु होत आहे. ग्रामिण भागात तंबाखूचे व्यसन अधिक असून, तंबाखूच्या मिश्रीचे व्यसन महिला वर्गामधे अतिप्रमाणात आहे. याचा विचार करून ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने युवकांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी गावातून प्रबोधन फेरी काढून लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यात आले. ग्रामस्थ व महिलांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

युवकांनी काढलेल्या प्रबोधन फेरीत वेगवेगळी वेषभूषा करून अंगावर फलक बांधुन मी आहे तंबाखू, तुम्ही मला खाल्ले तर मी तुम्हाला खाईन, मी आहे सिगारेट तुम्ही मला ओढले तर, मी तुम्हांला लवकर नेईन अशा अनोख्या घोषवाक्यांसह ही प्रबोधन फेरी संपूर्ण गावात फिरविण्यात आली. जनजागृती करणारे व व्यसनांचे दुष्परिणाम व दाहकता दाखविणारे उपक्रम गावागावात झाल्यास ग्रामस्थ व युवक, महिला यांच्यामधे व्यसनाधिनतेचे प्रमाण नक्कीच कमी होईल असे मत यावेळी बोलताना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वर्षा जवळ यांनी व्यक्त केले. या उपक्रमात सोमनाथ जवळ, ओमकार जवळ, अजय जवळ, नरेश जवळ, हर्षद जवळ, सिध्देश जवळ, आर्यन जवळ, प्रसाद जवळ इत्यादी युवक सहभागी झाले होते.

No comments