Header Ads

७०० वर्षांची परंपरा असलेली पंढरीची आषाढी पायी दिंडी यंदा नाही; आळंदी, देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार satara

पुणे : आषाढी वारीबद्दल निर्णय घेण्यासाठी आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये एकमत झाले आहे. आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भुमिका मांडल्या.

यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकूण घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भुमिका मांडण्यात आली. कोट्यावधी वैष्णवांचे श्रध्दास्थान आणि ७०० वर्षांची परंपरा असलेली पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरली जाऊ नये, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

No comments