Header Ads

सासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या; म्हसवडमध्ये गुन्हा satara

म्हसवड : मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून अर्धा तोळे सोने व तीन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात होता. त्याला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही खळबळजणक घटना माण तालुक्यात भालवडी येथे घडली. आसमा अस्लम मुलाणी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आसमा अस्लम मुलाणी (वय २३, रा. भालवडी) या विवाहितेस नवऱ्याला मोबाईल दुकान टाकण्यासाठी तीन लाख रुपये व लग्नात ठरलेले अर्धा तोळे सोने माहेरून घेऊन ये, यासाठी सतत जाचहाट केला जात होता. या त्रासाला कंटाळून विवाहिता आसमा मुलाणी हिने गुरुवारी पहाटे भालवडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नवरा असलम, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना, दुसरी सासू अमजद जाफर मुलाणी यांच्याविरुद्ध सूरज शिकंदर शेख (रा. लवंग, ता. माळशिरस) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करत आहेत.

No comments