Header Ads

उत्तर कोरेगावात आरोग्य कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड वाटप satara

सातारा : करोनाला रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावत आहेत. सरकारच्यावतीने त्यांना आवश्‍यक साधने पुरवण्यात येत आहेत. आपणही काही तरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून कोरेगाव तालुक्‍यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने फेसशिल्डचे वाटप करत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली. करोनाच्या लढाईत काही ठिकाणी डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत आवश्‍यक संरक्षक साहित्याशिवाय काम करत आहेत. त्याची दखल घेऊन डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना संरक्षणासाठी स्वखर्चातून फेस शिल्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उत्तर कोरेगावमधील जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे फेसशिल्ड सुपुर्द करण्यात आले. उपलब्धता होईल तसे इतर ठिकाणीही फेसशिल्ड देणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

सोनके गावात एक करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अशा परिस्थितीत ग्रामस्थांना प्रशासनाच्यावतीने सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत. घरातून बाहेर न निघण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. उत्तर कोरेगाव करोना मदत कक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. आमदार दीपक चव्हाण यांनीही सोनके गावास भेट देवून उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी डॉ. गायकवाड, दत्तूभाऊ धुमाळ, सतीशराव धुमाळ, संभाजी धुमाळ, प्रवीण धुमाळ, संजयकाका धुमाळ, नितीन धुमाळ, दशरथ धुमाळ, सुनील जगताप, हरिभाऊ धुमाळ, तलाठी नाळे, सोमनाथ धुमाळ, जितेंद्र धुमाळ, ग्रामसेवक अहिरेकर, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments