Header Ads

सातारा जिल्ह्यात ४५२ कोरोना बाधित; जिल्हा प्रवेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी satara

सातारा : सातारा जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आता सातारा जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या ४५२ झाल्याने जिल्हा प्रवेशाचा पुनर्विचार करावा अशी मागणी ग्रामीण भागातून होऊ लागली आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभाग, महसूल व पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य ठरणार आहे असे सूचित करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात ४५२ बाधित तर १३४ कोरोना मुक्त झाले असले तरी आतापर्यंत १५ जणांचे मृत्यू झाले आहेत. पुणे, मुंबई, नवीमुंबई, ठाणे जिल्ह्यातील मूळचे सातारकर अधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. त्यांचे ग्रामीण भागात १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात येत असले, तरी त्यांना फारशी सुविधा नाही. सातारा जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या आहेत. वळवाच्या पावसाने नुकसान होत असताना विलगीकरण झालेले लोक भयभीत झाले असून घरात विलगीकरण करण्यात आलेल्याची परस्थिती बरी आहे. काही ठिकाणी पोल्ट्री फार्म मध्ये विलगीकरण करण्यात आल्याचा तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत प्राथमिक चौकशी करण्याची तसदी घेतली जात नाही. संस्थात्मक विलगीकरणला वरिष्ठ अधिकारी भेट देत नाहीत. सर्वत्र कागदी घोडे नाचवले जात आहे.  त्यामुळे कोरोना पेक्षाही अधिक भीती गैरसोयीचे वाटू लागली आहे. अशी माहिती पुढे आली आहे. महिन्या भरापूर्वी गावाची वेस बंद करणारे व गाड्या अडवून माघारी पाठविणारे आता कुठे दडून बसले आहेत ? असा सवाल जावळी, खंडाळा, पाटण व कराड तालुक्यात विचारण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या नागरिकांची संख्या ४५२ झाली असून, या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या देखील अधिक आहे. ही संख्या वाढण्याची चिन्ह आहेत. कारण, लोकांना लॉकडाउन नियम पाळणे जिवावर आले असून, अनेक जण विनाकारण हिंडत असले तरी त्यांच्यावर अंकुश ठेवणे आवश्यक बाब बनली आहे. दुकाने उघडण्यात आली असली तरी नियमाचे पालन होते की नाही. हे पहाण्याची यंत्रणा पुरेसे नाही. याचा गैरफायदा सातारा शहरातील पोवई नाका येथील काही व्यापारी घेत असून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. याची ही जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करू लागले आहेत.

No comments