Header Ads

कोयना धरणग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप satara

पाटण : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सव्वा महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. जनतेच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्था, दानशुर व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणग्रस्तांना अर्घ्यम, बंगळुरू-सोपेकॉम, पुणे यांच्या वतीने जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. राज्याला विज, कृषी, सिंचनात स्वयंपूर्ण बनविण-या कोयना धरणाच्या उभारणीसाठी आपले सर्वस्व गमावलेल्या कोयना धरणग्रस्तांवर लॉककडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत अर्घ्यम, बंगळुरू-सोपेकॉम, पुणे या संस्था मदतीला धावून आल्या. साखर, तेल, कडधान्य, मसाले, साबण, कोलगेट आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप धरणग्रस्तांना करण्यात आले. या दानशुर संस्थांचे विशेष आभार कोयना धरणग्रस्तांनी मानले. यावेळी चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, सीताराम पवार, रामचंद्र कदम, गणेश शिर्के यांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून  प्रकल्पग्रस्तांना साहित्याचे वाटप केले.

No comments