Header Ads

आत्ताची तरूण पिढी ही शरद पवार या नावाच्या करिष्म्याच्या कथा ऐकत मोठी झाली; साहेबांच्या देहबोलीतूनच महाराष्ट्र झालाय खंबीर satara

सातारा : शरद पवार आणि आधार हे महाराष्ट्राचे गेल्या पन्नास वर्षांचे घट्ट झालेले समीकरण आहे. साहेब मैदानात उतरले कि प्रश्‍नांचा फडशा पडलाच अशीच महाराष्ट्रतील जनतेची धारणा आहे. त्यामुळेच कोणत्याही संकटांचा धिराने सामना करत राज्याने प्रत्येक बिकट लढाई जिंकली आहे. गेले ५० दिवस कोरोनाच्या आजाराशी देश व राज्य लढत आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु, संकटाचे निर्दलन करण्याचा नेमका धागा कोणत्याच सरकारला सापडला नसल्याने आता पुढे काय होणार या चिंतेन सर्वांना ग्रासले आहे. सर्व काही अनिश्चित वाटत असताना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आशावाद निर्माण झाला आहे. आत्ता नक्कीच काही तरी मार्ग निघेल असा विश्‍वास मना-मनात दाटून आला आहे. काल दिवसभरात समाज माध्यमांवर याचेच चित्र उमटले होते. आत्ताची तरूण पिढी ही शरद पवार या नावाच्या करिष्म्याच्या कथा ऐकत मोठी झाली.

समाजमाध्यमांच्या ट्रोलींगच्या या जमान्यात सुरवातीच्या टप्यात साहेबांची वेगळीच प्रतिमा सर्वांपुढे रंगविली गेली होती. त्यामुळे या माणसाने प्रत्यक्षात केलेल्या गोष्टींपेक्षा कपोलक्‍लपीत गोष्टीच जास्त मांडल्या गेल्या. त्यामुळे मागील काही कालावधीत तरूणाईच्या मनात या व्यक्तीची चुकीची प्रतीमा निर्माण करण्यात काहींना यश आले होते. परंतु, कोंबडा झाकल्याने सुर्य उगवायचा रहात नाही, याची प्रचीत मागील तीन- चार वर्षांत संपूर्ण राज्यातील तरूणाईला झाली.

शरद पवारांनी किल्लारीच्या भुकंपात चांगले काम केले, कच्छच्या भुकंपात गुजरात सावरण्यात मोलाची भुमिका बजावली. मुंबई दंगलीतून महाराष्ट्राला लवकर सावरले हे आत्ताची तरूणाई ऐकत होती. परंतु, निवडणूकीच्या काळात भ्रष्टवादी म्हणाऱ्या शरद पवारांचेच बोट धरून आम्ही मोठे झालो, त्यांचा महिन्यातून एक-दोनदा सल्ला घेत असतो हे प्रत्यक्ष मोंदीचे शब्द ऐकल्यानंतर पहिल्यांदा आत्ताच्या तरूणाईला जाणवले हा माणूस नक्कीच वेगळा आहे. त्यानंतरच्या गेल्या पाच वर्षांतील प्रत्येक टप्यावर महाराष्ट्राचा स्वाभीमाणी बाणा काय असतो याची दर्शन शरद पवारांनी आपल्या प्रत्येक कृतीतून दिले. दुष्काळाशी लढणाऱ्या जनतेला मदत देणे असो किंवा महापुरामध्ये प्रत्यक्ष लोकांच्यात जावून त्यांना दिलेला आधार असो प्रत्येक वेळी शरद पवार लोकांच्या मनाला भावत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ते केवळ शब्दांनी धिर देत नव्हते. लोकांच्या जावून त्यांच्यात मिसळून मिळालेल्या अनुभवातून, जाणलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी स्वत: प्रयत्न केले. तसेच सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या म्हणण्यानुसार मदतीची पद्धत बदलायला भाग पाडली. शरद पवारांचा एक हात जनतेच्या नाडीवर असतो हे त्यांच्या प्रत्येक संकटात घेतलेल्या भुमिकातून दिसून आले. त्यामुळेच प्रत्येक संकटात महाराष्ट्रातील जनतेला, तरूणाईला एक आधार मिळाला.

फिनिक्‍स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचे बळ मिळाले. आजही महाराष्ट्राल याच बळाची, प्रेरणेची आस आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यात राज्य सरकार आवश्‍यक ते प्रयत्न करत आहे. परंतु, पाहिजे तेवढे यश मिळताना दिसत नाही. बाधीतांची संख्या कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चक्रच कोलमडून गेले आहे. रेशनींगच्या रांगात उभे न राहणारे आता त्यात दिसत आहेत. रेशनींगवर जगणाऱ्यांची तर, फारच बिकट अवस्था झाली आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांची शिलकी संपूर्ण उधारी-उसनवारीवर जगणे चालू आहे. केंद्र व राज्य सरकार कितीही सांगत असले तरी, मालक वर्ग कामगारांचे पगार देत नाही. अत्यंत निराशाजनक वातावरण सर्वसामान्य जनतेत निर्माण झाले आहे. सामान्यांचे नेमके प्रश्‍न प्रशासनाला समजेनात कि समजूनही उमजेनात अशी एकंदर स्थिती आहे. त्यामुळे नको ते नियम व निर्बधांची भाऊ गर्दी झाली आहे.  केंद्राची नेमकी काय मदत मिळणार हे सामान्याला समजत नाही. अशा परिस्थीती देशाला प्रेरणा द्यायची असेल तर, पहिल्यांदा महाराष्ट्र खंबीर उभा होणे गरजेचे आहे. तेच होण्यासाठी गरज होती ती शरद पवारांनी मैदानात उतरण्याची. राज्यातील जनतेच्या मनातही तेच होते हे काल शरद पवार मैदानात उतरल्यानंतर समाज माध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रीयांतून समोर आले. साहेब कधी नव्हे अशी परिस्थीती उभी ठाकली आहे, राज्यालाच नव्हे तर, देशाला एका ठोस दिशेची गरज आहे. तुम्ही ते करून दाखवा असाच नाद राज्यातील प्रत्येक मनातून उमटत आहे. 

No comments