Header Ads

कोरेगाव तहसीलदारांच्या चौकशीत भिवडीचा दुकानदार दोषी; पुढील कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी करणार : उबाळेंच्या पाठपुराव्याला यश satara

कोरेगाव : भिवडी ता. कोरेगाव येथील बहुतांश रेशनकार्डधारकांना गेल्या तीन महिन्यांपासून रेशनच मिळाले नसल्याच्या प्रकरणाची चौकशी कोरेगावच्या तहसीलदारांनी करून चौकशीत संबधित दुकानदाराचे दोष आढळून आल्याचे निष्पन्न झाले असून, पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे हा अहवाल पाठविल्याची माहिती  भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांना तहसीलदारांनी पत्राद्वारे कळविले आहे.

भिवडी येथील बहुतांश रेशनकार्डधारकांना गेल्या तीन महिन्यांपासून रेशन मिळाले नसलयाची तक्रार ग्रामस्थानी रमेश उबाळे यांचेकडे केली होती. दरम्यानच्या कालावधीत लॉकडाउन असल्याने रमेश उबाळे पुणे येथे असल्याने ग्रामस्थांनी सदर लेखी तक्रार व लाभधारकांची नावे रमेश उबाळे यांना व्हाट्सअपवर पाठविली होती. रमेश उबाळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे तहसीलदार रोहिणी शिंदे व नायब तहसीलदार बेंद्रे यांचेशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तहसील कार्यलयाच्या मेलवर आपले निवेदन पाठविणेस सांगितले. रमेश उबाळे यांनी मेलद्वारे आपले निवेदन तहसील कार्यालयाला पाठविल्यानंतर तहसिलदार शिंदे यांनी पुरवठा निरीक्षक, मंडलाधिकारी कोरेगाव, तलाठी भिवडी यांना संबधीत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी विठ्ठल बाबुराव शेलार व इतर १५ जणांचे जबाब नोंदवून घेऊन संबधित रेशन दुकानदाराची चौकशी केली असता या चौकशीत दुकानदार दोषी आढळले असून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे तहसीलदार शिंदे यांनी रमेश उबाळे यांना पाठवून दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान रमेश उबाळे यांनीही तहसीलदार शिंदे यांनी भिवडी ग्रामस्थांच्या या अर्जाची दखल घेऊन पारदर्शकपणे  चौकशी केल्याबद्दल आभार व्यक्त केले असून  संबंधीत तीन महिन्यांपासून अन्न धान्यापासून वंचित असलेल्या रेशनकार्डधारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे अशी विनंती तहसीलदार यांचेकडे केली आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन दिले असून भिवडीच्या ग्रामस्थांना लवकरच  शासनाकडून धान्य मिळेल अशी आपली अपेक्षा असल्याचे म्हणणे रमेश उबाळे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान रमेश उबाळे यांनी पाठपुरावा करून  करून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु तत्पुर्वीच तहसीलदारांनी   चौकशी केली आहे. आमचे अन्न आम्हाला मिळत नव्हते परंतु रमेश उबाळे यांच्या कर्तृत्ववार आमचा विश्वास असून आम्हाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आशा भावना भिवडीकरांनी बोलताना व्यक्त केल्या.

No comments