Header Ads

वनवासमाचीतील १४ जण पॉझिटिव्ह; सातारा जिल्ह्यात ६९ कोरोन बाधित रूग्ण satara

कराड : सातारा जिल्ह्यात कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या निकटचे सहवासित २ महिलांचे (वय वर्षे १६ व ३७) रिपोर्ट शुक्रवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही रुग्ण वनवासमाची येथील आहेत. तर याच गावातील आणखी बारा लोकांना कोरोना झाल्याचे शुक्रवारी रात्री उशीरा स्पष्ट झाले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. तर एकट्या वनवासमाचीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २६ इतकी झाली आहे.

शुक्रवारी सकाळी कराड तालुक्यात आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यापैकी एक महिला साताऱ्यातील आहे. संबंधित महिलाही नोकरीनिमित्त सातारा ते कराड असा प्रवास करते. मात्र उर्वरित सात जण कराड शहर व उंब्रज येथील आहेत. यात कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने आणि कोरोनाने कराड शहरात प्रवेश केल्याने संपूर्ण कराड तालुक्यासह जिल्हा हादरला होता. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच सायंकाळी पुन्हा एकदा वनवासमाची येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा आणखी १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात वनवासमाचीतील १२ जणांचा समावेश आहे. तर अन्य दोन रुग्ण तालुक्यातील कोणत्या विभागातील आहेत ? याची खात्रीशीर माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळेच कराडात आता कोरोना रुग्णांची संख्या ५५ झाली असून सातारा जिल्ह्यात ६९ रूग्ण झाले आहेत.

त्याचवेळी कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील ७१ व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ३ अशा ७४ नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात ४५ रुग्ण कोविड-१९ बाधित असून आतापर्यंत ८ जण कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.

No comments