Header Ads

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने स्वागत satara

सातारा : मागील काही दिवसांपासून आषाढी वारीच्या संदर्भात चर्चा सुरू होत्या काही विचाराच्या राजकीय पक्षांनी याबाबत कोणत्याही परिस्थितीत पायी वारी झालीच पाहिजे अशी भूमिका घेत वारकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.परंतू आज दि २९ मे २०२० रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प्रमुख दिंडी चालक आणि संयोजकांसोबत झालेल्या बैठकीत यावर्षी पायी वारी न काढता आषाढी एकादशीला हेलिकॉप्टरमधून पाच वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख दिंड्या आणण्याचा निर्णय झालेला आहे या निर्णयाचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे वतीने स्वागत करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामधील दिंडी नंबर २७ चे हे.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज ,  विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रसेनजीत गायकवाड , कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव , सरचिटणीस कॉ. डॉ जालिंदर घिगे , प्रवक्ते विजय मांडके व कॉ. अविनाश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ,  आषाढी वारी आपला सांस्कृतिक वारसा असून बहुजन समाजाच्या एकतेचे प्रतीक असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीला देशभरातुन सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने देखील आषाढी वारीच्या वाटेवर आरोग्य शिबिराचे उपक्रम राबवले जातात.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने ह.भ.प. डॉ.सुहास फडतरे महाराज यांनी काही दिवसांपूर्वी वारीच्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली होती संत तुकोबा यांचे संदर्भ दिले होते. जर आपले आणि लोकांचे कल्याण होणार नसेल आणि अकल्याण होणार असेल अशा गोष्टी करु नयेत. जरी परंपरा असली आणि वाईट होणार असेल तर असली परंपरा मोडावी. मास्क लावल्याने भजन म्हणण्याचा आनंद घेता येणार नाही. तसे झाले तर पायीवारी ही दुःखदायक शिक्षा होईल. हे वारकरी संतांच्या विचारात बसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे असे कॉ. धनाजी गुरव व विजय मांडके यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने लोकभावना लक्षात घेऊन आणि आरोग्यविषयक खबरदारी म्हणून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. वारीच्या काळात विद्रोहीच्या वतीने ऑनलाईन प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येतील असेही विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे वतीने  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ बाबूराव गुरव , सहसचिव गौतम कांबळे ,  शिवराम ठवरे  यांनी म्हटले आहे.

No comments