Header Ads

१०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ८१ जणांना केले विलगीकरणात दाखल satara

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 7, वेणुताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 67, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथील 14 असे एकूण 106 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिलीआहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 45, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे बाधित रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे नमुने 10, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 26 असे एकूण 81 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

No comments